Blog 
भवताल” च्या वाटचालीत रुहा प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या वेबसाईट चे महत्वपूर्ण योगदान

भवताल” च्या वाटचालीत रुहा प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या वेबसाईट चे महत्वपूर्ण योगदान

जे.ए.सोल्युशन्स, रुहा, सातारा येथे तज्ञ पर्यावरण प्रेमी प्रमुख श्री. अभिजित घोरपडे यांनी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी त्यांनी रुहा प्लॅटफॉर्म वर तयार केलेल्या “भवताल” च्या वेबसाईट बद्दल कौतुकोद्गार काढले. “भवताल” या एन जी ओ द्वारे सर्वसामान्य पर्यावरण प्रेमींना आपल्या सभोवताल च्या पर्यावरणाची सजगपणे ओळख व्हावी व त्याद्वारे त्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमात योगदान द्यावे यासाठी प्रयत्नशील आहे. भवताल द्वारे पर्यावरणासाठी वाहिलेले मासिक काढले जाते तसेच पर्यावरण संबंधित अभ्यासक्रम राबवणे, गायडेड इकोटूर्स चे आयोजन करणे, पर्यावरणाची ओळख करून देणारे ब्लॉग्ज लेखन आशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्वच उपक्रमांना महाराष्ट्रातील हजारो जागरूक पर्यावरण प्रेमींचा अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

भवताल च्या अशा सर्व उपक्रमात रुहा प्लँटफॉर्म वर तयार केलेल्या त्यांच्या वेबसाईट चा खूपच उपयोग होतो. या वेबसाईट मध्ये सभोवताल ची विविध नैसर्गिक ठिकाणे, पाण्याचे तलाव, विहिरी , बारव, डोंगर, दऱ्या, खडक, वनराई अशा विविध गोष्टींचे अप्रतिम फोटो , त्याबद्दल माहिती, त्याचा ईतिहास अशा गोष्टी पोस्ट करणे, विविध इव्हेंट्स चे संपूर्ण मॅनेजमेंट करणे, वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या पेमेंट गेटवेज च्या सोयीमुळे विविध कोर्सेस च्या ऍडमिशन, इकोटूर्स नियोजन व याचे आर्थिक व्यवस्थापन अशा बाबी अतिशय सोप्या झाल्या आहेत. सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे भवताल च्या सर्व उपक्रमांचे डॉक्युमेंटेशन कायमस्वरूपी जतन केले जाऊ शकते. त्यादृष्टीने रुहा प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या वेबसाईट चे भवताल च्या यशस्वी वाटचालीत अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे अशी माहिती श्री अभिजित घोरपडे यांनी देऊन जे ए सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड चे सी ई ओ अलंकार जाधव यांचे मनःपूर्वक कौतुक केले. भवताल च्या पर्यावरणपूरक विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची अमूल्य संधी पर्यावरणस्नेही जे ए सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड यांना दिल्याबद्दल श्री अलंकार जाधव यांनी श्री अभिजित घोरपडे यांचे आभार मानले.

याचवेळेस भवताल चा खास दिवाळी निमित्त प्रसिद्ध झालेला विशेषांक साताऱ्याचे माननीय आमदार व पर्यावरणप्रेमी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना भेट देण्यात आला. सदर विशेषांकाचे मा. श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी कौतुक करून त्यांनी भवताल च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री अभिजित घोरपडे यांच्या जे ए सोल्युशन्स च्या भेटी प्रसंगी जे ए सोल्युशन्स चे प्रमुख श्री अलंकार जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी जे ए सोल्युशन्स ची टेक्निकल व डेव्हलपमेंट ची टीम तसेच अडमिनिस्ट्रेशन ची टीम प्रामुख्याने उपस्थित होती.